Ad will apear here
Next
चक्रीवादळ वेग घेतेय; रत्नागिरी, रायगड, मुंबईवासीयांनो सतर्क राहा...


मुंबई :
अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ आता तीव्र झाले असून, ते ईशान्येकडे अलिबागच्या दिशेने पुढे सरकत आहे. रत्नागिरीत वाऱ्यांचा वेग ताशी ५९ किलोमीटरपर्यंत वाढल्याची नोंद झाली असून, मुसळधार पाऊसही पडत आहे. वादळाचा केंद्रबिंदू आकुंचन पावत असल्यामुळे वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढत आहे. कोकणातील वाऱ्यांचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, पक्क्या घरातच राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या २० तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.  

तीन जून २०२० - भारतीय हवामान विभागाने सकाळी १० वाजता प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार निसर्ग चक्रीवादळाची स्थिती...
........
तीन जूनला सकाळी साडेनऊ वाजता निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रात ७२.५ अंश पूर्व आणि १७.६५ अंश उत्तर या अक्षांश-रेखांशावर होते.
हे स्थान अलिबागच्या दक्षिण-नैर्ऋत्येला ११५ किलोमीटर अंतरावर
मुंबईच्या दक्षिण-नैर्ऋत्येला १६५ किलोमीटर अंतरावर
सुरतच्या दक्षिण-नैर्ऋत्येला ३९५ किलोमीटर अंतरावर आहे.

केंद्रबिंदूजवळ वाऱ्यांचा वेग - ताशी १०० ते ११० आणि १२० किलोमीटरपर्यंत 
.........
किनाऱ्यांवर वाऱ्यांचा वेग (ताशी किलोमीटर) (तीन जूनला सकाळी साडेनऊ वाजता)
रत्नागिरी - ५९ 
हर्णै - २८
कुलाबा - नऊ
सांताक्रूझ - ११
डहाणू - दोन
.......
पाऊस (मिमी) (तीन जूनला सकाळी साडेआठपासून साडेनऊपर्यंतच्या तासाभरात)
रत्नागिरी - १०
हर्णै - ५४
कुलाबा - १
सांताक्रूझ - ०.४
..........
गेल्या सहा तासांत वादळ ताशी १४ किलोमीटर वेगाने ईशान्येकडे सरकले. हे वादळ आणखी तसेच पुढे सरकत, अतितीव्र रूप धारण करून तीन जूनच्या दुपारपर्यंत अलिबागच्या दक्षिणेला धडकेल. वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटरपर्यंत असेल.

वाऱ्यांचा वेग असा असेल - (ताशी किलोमीटर)
रायगड, मुंबई आणि ठाणे परिसर - १०० ते १२०
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ठाणे, पालघरचा काही भाग - ८५ ते १०५ 
वलसाड, नवसारी (गुजरात) - ६० ते ९० 
.........
लाटांची उंची (मीटर) (नेहमीपेक्षा इतकी जास्त अपेक्षित)
अलिबाग - ०.५ ते १.५
पेण - ०.८ ते १.१
ठाणे - ०.५ ते १.१
दापोली - ०.५ ते ०.८
गुहागर - ०.५ ते ०.६
वसई - ०.५ ते ०.६
.....
समुद्रकिनाऱ्यापासून इतके किलोमीटर आतपर्यंत पाणी जाण्याची शक्यता
अलिबाग - १.४ पर्यंत
पेण - २.८पर्यंत
ठाणे - ०.३४पर्यंत
दापोली - ०.१ पर्यंत
गुहागर - ०.२२पर्यंत
वसई - १.११पर्यंत

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZEFCN
Similar Posts
चक्रीवादळ मुंबईजवळ धडकण्याची शक्यता; अतिदक्षतेचा इशारा मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language